
मजुरीच्या दलदलीत अडकलेल्या 32 बालकामगारांची गुन्हे शाखेच्या जापू पथकाने सुटका केले. या बालकांना मजुरीसाठी जुंपून त्याचे शोषण करणाऱया 16 जणांना पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या.
गरीब घरातील अल्पवयीन मुलांना फूस लावत मुंबईत आणून त्यांना मजुरीच्या दलदलीत ढकलले जात असल्याने त्याची गुन्हे शाखेच्या अंमलबजावणी कक्षाने गंभीर दखल घेतली आहे. उपायुक्त डी. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली जापू शाखेचे प्रभारी निरीक्षक मनोज सुतार व पथकाने अल्पवयीन मुलांना कामासाठी ठेवणाऱयांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार जापू शाखेने दोन महिन्यांत विविध ठिकाणी असलेल्या आस्थापनांवर छापेमारी करून नऊ गुन्हे दाखल केले. तसेच बालकांना मजुरी करायला लावणाऱया 16 जणांना बेडय़ा ठोकल्या आणि त्यांच्या तावडीतून 32 परप्रांतीय बालकामगारांची सुटका केली. त्यात सहा नेपाळी अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. यापुढे ही बालकामगारांविरोधातील कारवाई सुरूच राहणार असून कारखाने, हॉटेल्स आदी ठिकाणी बालकामगार दिसल्यास जापू शाखेकडे माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
– नागपाडा, ओशिवरा, शिवाजी नगर, आग्रीपाडा, समता नगर, वरळी, मानखुर्द, साकीनाका या ठिकाणी असलेल्या आस्थापनांवर कारवाई करत त्या आस्थापनांच्या 16 मालकांवर कायदेशीर कारवाई केली.
कुठले किती बालकामगार
– नेपाळ – 6 n उत्तर प्रदेश – 5
– बिहार – 16 n पश्चिम बंगाल – 5
























































