धुमश्चक्री सुरूच… गाझात मदत केंद्रात जाणाऱ्या पॅलेस्टिनींवर गोळीबार; 32 ठार, 232 जखमी

गाझा येथील मदत केंद्रात मदत साहित्य गोळा करण्यासाठी जाणाऱ्या पॅलेस्टिनी नागरिकांवर रविवारी गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात 32 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला तर 232 जण जखमी झाले. इस्रायली सैन्यानेच हा गोळीबार केला आहे, असा आरोप पॅलेस्टिनी केला आहे.

गाझामध्ये लोक मदत वितरण केंद्राकडे अन्नसाहित्य आणायला जात असताना जमावावर इस्रायली सैन्याने भर चौकात गोळीबार केला. पॅलेस्टिनी नागरिकांना मदत साहित्य घेऊन येणारे 16 ट्रक मदत वितरण केंद्राकडे आले होते. त्यावेळी हा गोळीबार झाला. दरम्यान, या गोळीबारात किमान 32 लोकांचा मृत्यू झाला आहे.  मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये दोघा महिलांचा समावेश आहे, असे गाझा आरोग्य मंत्रालयाच्या रेकॉर्ड विभागाचे प्रमुख झहेर अल-वाहिदी यांनी सांगितले.

कोणीही जखमी झाले नाही

मदत वितरण पेंद्राजवळ इस्रायली सैनिकांनी केलेल्या गोळीबारात कोणीही जखमी झाल्याची माहिती नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे इस्रायली लष्कराने सांगितले. या आधीही 27 मे ते 1 जून या कालावधीत गाझामध्ये अन्न वाटपादरम्यान झालेल्या गोळीबारात 49 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी 300 हून अधिक लोक जखमी झाले आहेत, असे वृत्त अल-जझीरा या वाहिनीने दिले आहे.