कोकण बोर्डातील 32 हजार विद्यार्थ्यांना मिळणार कॉलेजमध्ये प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीची परिक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे कोकण बोर्डातील 32 हजार 139 विद्यार्थी परिक्षा न देताच अकरावी प्रवेश घेणार आहेत. कोरानाची दुसरी लाट संपूर्ण देशात पसरली आहे. महाराष्ट्रातही कोरोना झपाट्याने वाढत आहे. गतवर्षीपासून कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष कोलमडले होते. काही महिने शाळा ऑनलाईन भरल्या होत्या.

परिक्षांच्या तारखा जाहिर झाल्या असताना कोरोनाने डोके वर काढले. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या परिस्थितीत विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा विचार करता राज्य शासनाने दहावीच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे दहावीतील सर्वच विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश दिला जाणार आहे. परिक्षा न देताच विद्यार्थी पास होणार असले तरीही त्यांचे त्यांच्या मुल्यांकनाबाबतचे धोरण अद्यापही शिक्षण मंडळाने जाहीर केलेले नाही. याच अंमलबजावणी झाल्यास 32 हजार 139 विद्यार्थी पास होणार आहे. जिल्ह्यात 114 परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार होती. त्यात 560 पुन्हा बसलेले तर 31 हजार 579 नियमित विद्यार्थी यांचा समावेश आहे. त्यात रत्नागिरीतून 21 हजार 378 तर सिंधुदुर्गमधून 10 हजार 201 विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहेत.