अकोल्यात आढळले कोरोनाचे 33 रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 3 हजारच्या वर

504

अकोल्यात आज कोरोनाचे 33 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 3 हजार 53 वर पोहोचली आहे. आज दिवसभरात 10 रुग्ण बरे झाले. तर एका रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या 116 वर पोहोचली आहे.

आज दिवसभरात 33 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.  दरम्यान, काल रात्री प्राप्त झालेल्या रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे.

512 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 3 हजार 53 आहे. त्यातील  116 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  2425 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 512 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या