लातूर जिल्ह्यात आढळले कोरोनाचे 336 रुग्ण, 7 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 336 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 9879 वर पोहंचलेली आहे. तर आज उपचारादरम्यान 7 रुग्णांचा मृत्यू आहे.

288 आरटीपीसीआर टेस्टमधे 70 रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आलेले आहेत तर 1046 अ‍ॅन्टीजीन टेस्टमध्ये 266 रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आलेले आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत 61398 जणांची तपासणी करण्यात आलेली असून त्यामध्ये 9879 रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आलेले आहेत.

उपचारादरम्यान आज 7 रुग्णांचे मृत्यू झालेले असल्याचे प्रशासनाने जाहिर केलेले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता 314 वर पोहंचलेली आहे. लातूर जिल्ह्यात सध्या 2633 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर 6932 रुग्ण उपचाराने बरे होऊन आपल्या घरी परतलेले आहेत. आज तब्बल 217 रुग्ण उपचारानंतर घरी परतलेले आहेत.