छत्तीसगडमधील बस्तर भागात अबुजमाडच्या जंगलात शुक्रवारी सुरक्षा जवानांशी झालेल्या चकमकीत 36 नक्षलवादी ठार झाले. या जंगलात नक्षलवाद्यांचा मोठा तळ पडल्याची खबर मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या नक्षलवाद्यांना घेरले होते.
या नक्षलवाद्यांना दुपारी एकच्या सुमारास सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकांनी घेरल्यानंतर या चकमकीला तोंड फुटले. दोन्ही बाजूंनी तुफानी गोळीबार संध्याकाळीही सुरू होता. अबुजमाडमधील थुल्थुली आणि नेंदूर गावांदरम्यानच्या जंगलात ही चकमक झाली, असे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी सांगितले.