नगरमध्ये 12 अहवाल निगेटिव्ह; 37 अहवालांची प्रतीक्षा

515

नगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या अहवालापैकी 12 अहवाल निगेटिव्ह आले असून उर्वरित 37 अहवालांची प्रतीक्षा असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने सांगितले. शनिवारी रात्री पाथर्डी तालुक्यातील मोहोजदेवढे येथील एक व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले होते. तसेच उर्वरित 12 अहवाल शनिवारी रात्री उशीरा मिळाले. पाथर्डी तालुक्यातील या कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींसह इतर अशा एकूण 37 व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्या अहवालांची अद्याप प्रतीक्षा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या