अकोल्यात आढळले कोरोनाचे 39 रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 1742 वर

469

अकोल्यात आज कोरोनाचे 39 रुग्ण आढळले आहेत तर 28 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 1742  झाली आहे. आज दिवसभरात 28 रुग्ण बरे होऊन घरी गेले. आजअखेर 367 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.

आज दिवसभरात 39 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. सकाळच्या अहवालात 33 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात 17 महिला तर 16 पुरुष रुग्ण आहेत. दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 10 तर कोविड केअर सेंटर येथून 18  अशा एकूण 28 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत  एकूण 1742 पॉझिटीव्ह अहवालांची संख्या आहे. त्यातील 89 जण (एक आत्महत्या व 88 कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या 128६ आहे. तर सद्यस्थितीत 367 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या