आठ ट्रकमधून राजस्थानमध्ये जाणाऱ्या 396 मजुरांना पकडले

1564

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तेलंगाणा व आंध्रप्रदेश या दोन राज्यातून 8 ट्रकद्वारे राजस्थानकडे निघालेल्या 396 मजुरांना हिंगोली जिल्ह्यातील कनेरगाव नाका येथील चेकपोस्टवर आज शुक्रवारी पकडण्यात आले. या सर्वांची वैद्यकीय तपासणी करून हिंगोलीत स्थानबद्ध करून ठेवण्यात आले आहे.

नांदेड ते अकोला महामार्गावरील हिंगोली तालुक्याच्या कनेरगाव नाका येथे कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हा सिमाबंदीच्या अंमलबजावणीसाठी चेकपोस्ट कार्यान्वित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सीमांवर कडक पहारा ठेऊन प्रत्येक वाहनाची तपासणी करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी दिल्या आहेत. तर गुरुवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरीबम शर्मा, उप मुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी यांनी कनेरगाव चेकपोस्टला अचानक भेट देऊन पाहणी केली होती. आज शुक्रवारी कनेरगाव नाका चेकपोस्टवरील पोलिसांनी तपासणी दरम्यान आठ ट्रकमध्ये लपून प्रवास करणाऱ्या 396 कामगारांना पकडले आहे. हे सर्वजण तेलंगणा व आंध्रप्रदेशातून राजस्थानकडे जात होते. या सर्व मजुरांची वैद्यकिय तपासणी करून हिंगोलीत स्थानबध्द करून ठेवण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या