ट्रेंड – ‘3डी मॉडेल’ फोटोचा धुमाकूळ

इन्स्टाग्राम असो की फेसबुक, कोणत्याही सोशल मीडिया साईटवर स्क्रोलिंग करताना आपल्याला मित्र-मैत्रिणींचे किंवा एखाद्या सेलिब्रिटीचे ‘3डी मॉडेल’ फोटो दिसत आहेत. ही भानगड आहे तरी काय, असा प्रश्न पडतो. ही खरे तर एआयची जादू आहे. हे एक ‘नॅनो बनाना’ नावाचे एक एआय टुल आहे, जे सध्या सगळीकडे धूमाकूळ घालतेय. काही दिवसांपूर्वी घिबली इमेजचा ट्रेंड आला होता, तो मागे पडल्यावर आता एआयने नवे टूल आणले असून त्यात अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी तुम्हीदेखील तुमचे थ्रीडी मॉडेल बनवू शकता आणि मग तो सोशल मीडियावरही शेअर करू शकता. अनेक सेलिब्रिटींनीही हा ट्रेंड फॉलो करत त्यांची थ्रीडी इमेज बनवली असून ते फोटो शेअर केले आहेत.