सोलापुरात कोरोनाचे 4 रुग्ण वाढले; संचारबंदी सोमवारपर्यंत कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर शहरात आणखी 4 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. आता सोलापुरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 37 झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांनी गुरुवारी बैठक घेत कोरोनाबाबतचा आढावा घेतला.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सोलापूर शहरातील होम टू होम सर्व्हे होणे गरजेचे असून याकरिता योग्य ती खबरदारी घेऊन महापालिका कर्मचाऱ्यांसोबत जिल्हा परिषदेचीही 300 ते 400 जणांची टीम काम करणार आहे. यासाठी सर्व सोलापूरकरांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले. तसेच गुरुवारी संचारबंदीची मुदत संपणार होती. मात्र, सोमवारपर्यंत होम टू होम सर्व्हे पूर्ण होईपर्यंत संचारबंदी कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.