
परभणी जिल्ह्यात आज 4 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. हे रूग्ण ज्या परिसरात आढळून आले आहेत तिथे कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 20 वर पोहोचली असून आहे.
गुरुवार, 21 मे रोजी प्रशासनाला प्राप्त झालेल्या कोरोना अहवालामध्ये जिल्ह्यातील विविध भागातील 4 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून यामुळे शहरवासियांची चिंता वाढली आहे. या अहवालामध्ये शेळगाव येथील १ व्यक्ती, परभणी शहरातील मिलिंद नगर, मातोश्री नगर येथील प्रत्येकी एक व परभणी तालुक्यातील असोला या गावातील १ अशा एकूण ४ रुग्णांची भर पडली आहे.
याआधी जिंतूर तालुक्यातील शेवडी येथे तीन, परभणी शहरातील मिलींद नगर भागात एक, साखला प्लॉट परिसरात एक आणि सोनपेठ तालुक्यात शेळगाव येथे एक असे रूग्ण आढळले होते. त्यानंतर सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथील ६, पूर्णा तालुक्यातील माटेगाव येथील १ आणि गंगाखेड येथील १ व परभणी तालुक्यातील एका रूग्णाचा समावेश आहे..





























































