
सामना ऑनलाईन,नवी दिल्ली
सोशल मीडियावरील ‘मी टू’ वादळाची गंभीर दखल केंद्र सरकारने घेतली आहे. ‘मी टू’ प्र्रकरणांची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यांची समिती गठीत करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्राrय महिला अणि बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी आज दिली.
साजिद, नानाचे ‘हाऊसफुल-4’ मधून पॅकअप
‘मी टू’च्या फेऱ्यात सापडलेल्या दिग्दर्शक साजिद खान आणि अभिनेते नाना पाटेकर यांना ‘हाऊसफुल-4’ या आगामी चित्रपटातून बाहेर पडावे लागले आहे. साजिद खान याच्यावर पत्रकार करिष्मा उपाध्याय हिने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. साजिदने अनेक महिने लैंगिक आणि मानसिक शोषण केल्याचा आरोप ‘हमशक्ल’ चित्रपटात साजिदची सहदिग्दर्शिका असलेल्या सलोनी चोप्रा हिनेही केला आहे. याशिवाय अभिनेत्री रॅचेल व्हाइटनेही साजिदवर आरोप केलेले आहेत.
‘मी टू’ अंतर्गत ज्या व्यथा मांडल्या जात आहेत त्यामागील वेदना मी समजू शकते. त्यामुळेच या अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक प्रकरणाची व्यापक चौकशी व्हावी असे आम्हाला वाटत असून समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव देण्यात येत आहे. तसेच लैंगिक शोषणाशी संबंधित तक्रारींबाबत कायदेशीर तसेच घटनात्मक बाजूने फ्रेमवर्क करून त्याद्वारे ही प्रकरणे हाताळण्यात समिती मदत करेल.
‘हाऊसफुल 4’ या चित्रपटाचा अभिनेता अक्षयकुमार याने ‘मी टू’ मोहिमेला पाठिंबा देत शूटिंग रद्द केल्याचे ट्विट केले. ट्विटमध्ये अक्षयने लिहिलेय की, तपास पूर्ण होईपर्यंत चित्रीकरण थांबवण्याची विनंती निर्मात्यांना केली आहे. जो दोषी सिद्ध होईल त्याच्यासोबत मी काम करणार नाही. पीडितांना न्याय मिळाला पाहिजे.
लैंगिक शोषणाची घटना जेक्हा घडते त्याचकेळी त्याकिरोधात आकाज उठका, नंतर बोलून काही उपयोग नाही. सिनेमा इंडस्ट्रीत बलात्कार होत नाहीत, बळजबरी होत नाही. ज्या गोष्टी होतात त्या परस्पर सहमतीने होतात, असे सांगत अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने खळबळ उडवून दिली आहे. आता जे होतंय ते सर्क बककास आहे, असे ती म्हणाली.

























































