
सामना प्रतिनिधी । मुंबई
राज्यात तब्बल 40 विद्यापीठे बोगस असल्याची कबुली राज्य सरकारच्या वतीने आज विधान परिषदेत दिली. उच्च व तंत्रशिक्षण विभागाला फेब्रुवारी 2019 मध्ये ही विद्यापीठे बोगस असल्याचे आढळून आले. याप्रकरणी काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे, अशोक जगताप, आनंदराव पाटील यांनी याबाबतचा तारांकित प्रश्न विचारला होता. त्याला उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी उत्तर दिले.
याप्रकरणी शासनाकडून कारवाई होत नसल्याचा आरोप करत पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात पुण्याच्या मानवी हक्क संरक्षण समितीने तक्रार दाखल केली होती. याबाबत चौकशी सुरू असल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले.




























































