शिर्डीत गर्दी वाढली, अडीच दिवसात 40 हजाराहून अधिक भाविकांनी घेतले दर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सलग सुट्टयांमुळे शिर्डीत साईदर्शनासाठी येणाऱ्य़ा भाविकांची संख्या सातत्याने वाढत आहे. गर्दीमुळे भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे. ऑनलाईन बुकींग करूनच साई दर्शनासाठी या असे आवाहन साईबाबा संस्थानने करून देखील भाविकांनी ऑनलाइन ऐवजी दर्शनासाठी ऑफलाईन पास मार्गाचा अवलंबल केला आहे. त्यामुळे सोशल डिस्टेंन्सचा फज्जा उडत आहे. अडीच दिवसात 40 हजाराहून अधिक भावीकांनी दर्शन घेतले आहे.

साई मंदिरात प्रशासनाकडुन आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र ऑफलाईन पास काढून दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होत असल्याने मंदिराच्या बाह्य परिसरात भाविकांची लांबच रांग दिसुन आहे.

आरतीच्या वेळी दर्शन बंद असल्याने त्या काळात गर्दी अधिकच वाढत आहे. मंदिराच्या बाह्य परिसरात रस्त्यावर होणीरी गर्दी टाळण्यासाठी संस्थानकडुन उपाययोजना करण्याची नितांत गरज असून त्या दृष्ठीने प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होत आहे.

सुट्टीच्या दोन दिवसात 30 हजार तर रविवार दुपार पर्यंत 10 हजार भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. नवीन वर्षाचं स्वागत साई दर्शनाने करण्यासाठी भाविकांची 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.