हैदराबाद विमानतळावर 40 कोटींचा गांजा जप्त करत महिलेला अटक

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने बुधवारी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका महिला प्रवाशाच्या सामानातून 400 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त केला. गांजाची अंदाजे किंमत 40 कोटी रुपये असल्याचे एनसीबीने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. गुप्तचर माहितीच्या आधारे, एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी महिला प्रवाशाला ताब्यात घेतले आणि तिच्या दोन चेक-इन बॅगमधून 400 किलो बंदी घातलेला गांजा जप्त केलेला आहे.

बुधवारी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका महिला प्रवाशाच्या सामानातून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने 400 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त केला. ही माहिती अधिकृत प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे. तपासात असे निदर्शनास आले की, संशय टाळण्यासाठी महिलेने बँकॉकमधून हा गांजा खरेदी केला होता. ही महिला गांजा घेऊन दुबईमार्गे हिंदुस्थानात परतली. महिलेने थेट बॅंकाकवरुन न येता दुबईवरुन येण्याचे ठरवले होते. याआधी बँकॉकहून थेट विविध हिंदुस्थानी विमानतळांवर येणाऱ्या प्रवाशांकडून हायड्रोपोनिक गांजा जप्त केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. थायलंड आणि हिंदुस्थानात या महिलेसंदर्भातील अधिक माहिती मिळवण्याचे सुरु आहे.