
सामना ऑनलाईन । संभाजीनगर
संभाजीनगरमध्ये नऊ ऑगस्ट रोजी झालेल्या मराठा क्रांतीमोर्चाच्या बंदला वाळूज एमआयडीसी मध्ये हिंसक वळण लागले होते. आंदोलनादरम्यान अनेक कंपन्यांमध्ये अज्ञातांनी तोडफोड केली होती, तसेच कामगारांनाही धमकावलं होतं. या हिंसेत जवळपास ६० कंपन्यांचे मोठे नुकसान झाले होते, तर १० ते १२ छोट्या कंपन्यांचेही नुकसान झाले होत. या प्रकरणी सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी आत्तापर्यंत ४१ जणांना ताब्यात घेतले असून आणखी काही जणांचा शोध सुरु आहे.
वाळूज एमआयडीसीवर समाजकंटकांचा हल्ला! संभाजीनगरचे उद्योगजगत हादरले
दरम्यान मराठवाड्यात जवळपास पाच हजार आंदोलकांवर वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या हिंसाचाराप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.




























































