सीनियर राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग : महाराष्ट्राच्या पुरुष, महिला संघांना उपविजेतेपद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कूचबिहार (प.बंगाल) येथे खेळविण्यात आलेल्या सीनियर राष्ट्रीय पातळीवरील पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघांनी चमकदार कामगिरी नोंदवत सांघिक उपविजेतेपद पटकावले. महाराष्ट्राने 2 सुवर्ण, 3 रौप्य आणि 4 कास्यपदकांसह एकूण 9 पदके पटकावली, तर अभिजित गुरुव व सोनल सावंत यांनी अनुक्रमे ‘स्ट्राँग मॅन’ आणि ‘स्ट्राँग वुमेन’ किताब पटकावत संघाच्या यशात सिंहाचा वाटा उचलला. महाराष्ट्राचे पॉवरलिफ्टिंग प्रशिक्षक अनंत चाळके, सूर्यकांत गद्रे व व्यवस्थापक संजय सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या उभय संघांनी शानदार कामगिरी साकारली.

पुरुष गट ः सचिन नेरकर, 59 कि.ग्रॅ. (ठाणे कास्यपदक), अभिजित गुरव, 66 कि.ग्रॅ. (मुंबई उपनगर, सुवर्णपदक), साहिल उतेकर, 66 कि.ग्रॅ. (मुंबई शहर, रौप्यपदक), किरण सणस, 74 कि.ग्रॅ. (मुंबई उपनगर, कास्यपदक), नीलेश गराटे, 83 कि.ग्रॅ. (मुंबई उपनगर, रौप्यपदक) महिला गट ः सोनल सावंत, 57 कि.ग्रॅ. (कोल्हापूर, सुवर्णपदक), संपदा नागवेकर, 63 कि.ग्रॅ. (मुंबई शहर, रौप्यपदक), भक्ती आंब्रे, 84 कि.ग्रॅ. (मुंबई शहर, कास्यपदक), श्रेया बोर्डेकर, 84 कि.ग्रॅ.वरील (मुंबई शहर, कास्यपदक)