
देशभरात कोरोना रुग्णांच्या रुग्णांमध्ये पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. चार दिवसांमध्ये रुग्णसंख्या जवळपास दुप्पट झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून देशात 40 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत असून सक्रिय रुग्णांची संख्या यामुळे वाढली आहे.
गेल्या 24 तासामध्ये देशात 44 हजार 658 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 32 हजार 988 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच 496 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील सक्रिय रुग्णांचा आकडाही 3 लाख 44 हजार 899 वर पोहोचला आहे.
India reports 44,658 new #COVID19 cases,32,988 recoveries and 496 deaths in the last 24 hrs, as per Health Ministry.
Total cases: 3,26,03,188
Total recoveries: 3,18,21,428
Active cases: 3,44,899
Death toll: 4,36,861Total vaccinated: 61,22,08,542 (79,48,439) in last 24 hrs pic.twitter.com/3Ekda2cKBP
— ANI (@ANI) August 27, 2021
चार दिवसांची आकडेवारी भीतीदायक
24 ऑगस्ट – 25 हजार 467 रुग्ण
25 ऑगस्ट – 37 हजार 593 रुग्ण
26 ऑगस्ट – 46 हजार 164 रुग्ण
27 ऑगस्ट – 44 हजार 658 रुग्ण
दरम्यान, केरळमधील परिस्थितीमुळे केंद्र सरकारपुढील चिंता वाढली आहे. येथे गेल्या दोन दिवसांपासून 30 हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. गेल्या 24 तासात देखील 30 हजार 7 रुग्णांची नोंद झाली असून 162 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
लसीकरणावर जोर
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 26 ऑगस्टपर्यंत देशात 61 कोटी 22 लाख 8 हजार लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. गेल्या 24 तासात 79.58 लोकांची लसीकरण करण्यात आले आहे. तसेच आतापर्यंत देशात 51 कोटी 49 लाख लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली असल्याची माहिती आयसीएमआरने दिली.

























































