दहिसरच्या एसव्हीपी कॉलेजमधील बारावीच्या 47 विद्यार्थ्यांचे निकाल रखडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । मुंबई

दहिसर येथील सरदार वल्लभभाई पटेल कनिष्ठ महाविद्यालयातील बारावी कॉमर्स व सायन्सच्या 47 विद्यार्थ्यांचे निकाल रखडले आहेत. ते निकाल लवकरात लवकर जाहीर करा, अशी मागणी युवासेनेने केली आहे. स्थलांतर प्रमाणपत्र पाठवण्यास विलंब झाल्याने तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्डाने लक्ष न दिल्यामुळे या 47 विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवण्यात आले.

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारिणी सदस्य सिद्धेश कदम यांच्या सूचनेवरून युवासेनेच्या सिनेट सदस्यांनी यासंदर्भात महाविद्यालयाचे विश्वस्त मेहुल पटेल व मनीष ठाकर यांची भेट घेऊन निकाल लवकर जाहीर करण्याबाबत निवेदन दिले. याप्रसंगी सिनेट सदस्य शशिकांत झोरे, महादेव जगताप, नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद, विभाग अधिकारी रिझवान शेख, विधानसभा समन्वयक अक्षय राऊत, शाखा अधिकारी जितेश रणदिवे उपस्थित होते.