साईचरणी नऊ दिवसांत तीन कोटींची देणगी

राज्य शासनाच्या आदेशानंतर श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. 16 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर या नऊ दिवसांत सुमारे 48 हजार 224 साईभक्तांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला. या काळात साईभक्तांकडून विविधप्रकारे 3 कोटी 9 लाख 83 हजार 148 रुपयांची देणगी संस्थानला प्राप्त झाली आहे.

कोरोनाच्या संकटामुळे 17 मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले होते. राज्य शासनाच्या आदेशान्वये 16 नोव्हेंबरपासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. तेव्हापासून आजवर 48 हजार 224 साईभक्तांनी साईदर्शनाचा लाभ घेतला. यामध्ये टाइम बेस, जनसंपर्क कार्यालय व ऑनलाईन या सेवांचा समावेश असून, ऑनलाईन व सशुल्क दर्शन/आरती पासेसव्दारे 61 लाख 04 हजार 600 रुपये प्राप्त झाले आहे. श्री साईप्रसादालयामध्ये सुमारे 80 हजार साईभक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला.

या कालावधीत रोख स्वरूपात एकूण 3 कोटी 9 लाख 83 हजार 148 रुपये देणगी प्राप्त झाली आहे. यामध्ये दक्षिणापेटीत 1 कोटी 52 लाख 57 हजार 102 रुपये, देणगी काऊंटरवर 33 लाख 6 हजार 632 रुपये, डेबिट-क्रेडिट कार्ड, ऑनलाईन, चेक, डी. डी. देणगी, मनी ऑर्डर आदींच्या माध्यमातून 1 कोटी 22 लाख 50 हजार 822 रुपये व 6 देशांचे परकीय चलन अंदाजे रुपये 1 लाख 68 हजार 592 यांचा समावेश आहे. तर 64.500 ग्रॅम सोने व 3801.300 ग्रॅम चांदी संस्थानला देणगी स्वरूपात प्राप्त झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या