
भगवान रामाचे जन्मस्थान असलेली अयोध्या नगरी दिवाळीच्या या शुभ मुहुर्तावर साडेपाच लाख दिव्यांनी उजळली आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात दिवे प्रज्वलित करण्यात आल्यामुळे याची विक्रमात नोंद झाली आहे. या दीपोत्सवात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सहभागी झाले आहेत. त्यांनी जनतेला दीपोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी जनतेला संबोधित केल्यावर दिवे प्रज्वलीत करण्याचे काम सुरू करण्यात आले. अयोध्येत शरयूकिनारी साडेपाच लाख दिवे लावण्यात आले आहेत. हा एक विश्वविक्रम आहे. या विक्रमासाठी दिव्यांची मोजणीही सुरू होती. ती पूर्ण झाल्याने विक्रमाची नोंद झाल्यावर आतषबाजी करून आनंद व्यक्त करण्यात आला आहे.
‘Deepotsava’ celebrations underway at Ram ki Paidi in Ayodhya. pic.twitter.com/Bup5MLwMfq
— ANI UP (@ANINewsUP) October 26, 2019
मोदी सरकारच्या काळात कोणत्याही भेदभावाशिवाय सर्वांचा विकास होत असल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी सांगितले. याआधीची सरकारे अयोध्येच्या नावालाही घाबरत होती. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी रामराज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणल्याचे आदित्यनाथ यांनी आपल्या भाषणात सांगितले. मोदी यांनी जगाला आपल्या महान परंपरेची ओळख करून दिल्यामुळे देश विश्वगुरू बनत असल्याचेही योगी म्हणाले. अयोध्येचा कायापालट करण्यासाठी केंद्र आणि राज्य सराकारकडून विविध योजना आणण्यात येत आहेत. त्यासाठी 226 कोटी योजनांची पायाभरणी आणि लोकार्पण करण्यात येत आहे. प्रधानमंत्री आवास, शौचालय, उज्ज्वला, वीज आणि आयुष्मानसारख्या योजनांमुळे जनतेचा फायदा झाल्याचेही ते म्हणाले. अयोध्येत विकासाची गंगा वाहणार असून या स्थानाला त्याची ओळख मिळणार आहे. हिंदुस्थान कधीही कोणाला डिवचत नाही. मात्र, कोणी डिवचले तर त्याला सोडत नाही, अशा श्ब्दांत त्यांनी पाकिस्तानलाही इशारा दिला.
UP CM Yogi Adityanath in Ayodhya: Bharat kisi ko chedta nahi, lekin agar koi chedta hai toh phir usko chorta nahi…aaj Bharat us sthiti mein pahunch chuka hai. pic.twitter.com/cgTugCh8Kk
— ANI UP (@ANINewsUP) October 26, 2019
अयोध्या साडेपाच दिव्यांनी उजळवण्यासाठी अवध विश्वविद्यालयाच्या 6000 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. त्यांनी राम की पैडी आणि इतर घाटांवर दिवे सजवून ते प्रज्वलीत करण्याचे काम केले. गेल्या दोन वर्षांपासून योगी सरकार अयोध्येत दीपोत्सव साजरा करत आहे. गेल्यावर्षी अयोध्येत तीन लाख दिवे प्रज्वलीत करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही पुष्पकरुपी हेलिकॉप्टरमध्ये बसून राम, लक्ष्मण आणि सीतेचा वेष परिधान केलेले कलाकार अवतरले. त्यांचे योगी आदित्यनाथ यांनी स्वागत केले.
Chief Minister Yogi Adityanath and Governor Anandiben Patel participate in ‘Deepotsava’ celebrations in Ayodhya. pic.twitter.com/mjhcQF2XBq
— ANI UP (@ANINewsUP) October 26, 2019




























































