बिबटय़ाची कातडी व खवले मांजराच्या खवल्यांसह 5 आरोपींना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागपूर वनविभागाने गोंदिया विभागाच्या पथकासह संयुक्त कारवाई करत बिबटय़ाची कातडी व खवले मांजराच्या खवल्यांसह पाच आरोपींना अटक केली. गोंदिया येथे ही कारवाई करण्यात आली. गोंदिया येथे बिबटय़ाच्या कातडीची तस्करी होणार असल्याची माहिती नागपूर वनविभागाला मिळाली. या तस्करीवर वनखाते नजर ठेवून होते.

सापळा रचून पाचही आरोपींना अटक करण्यात आली. निखिल आगडे, कैलास घुमके, हेमराज उके, मिथून घुमके, मनोज मानकर अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून बिबटय़ाचे एक कातडे व खवले मांजराचे 3.25 किलो खवले आणि दुचाकी जप्त करण्यात आली.