बीड जिल्ह्यात आढळले कोरोनाचे 5 रुग्ण, एकूण रुग्ण 61 वर

1598

बीड जिल्ह्यात आज पुन्हा 5 रुग्ण बाधित निघाले आहेत. त्यामुळे एकूण कोरोना रुग्णांची संख्या 61 वर पोहोचली आहे. बीड जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढत चालला आहे.

संक्रमण रोखण्यासाठी बीड शहरासह काही गावात संचारबंदी लागू केली गेली आहे, तगडा बंदोबस्त रस्त्यावर उतरविला आहे. या पार्शवभूमीवर आज 41 स्वॅबचे नमुने पाठविलेले  होते. त्यामध्ये  5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर 36 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज सापडलेले पाच रुग्ण  1 – पाटोदा शहर,1 – धारूर, 3 – कारेगाव ता पाटोदा असे आहेत. आता एकूण कोरोना ग्रस्त 61 एवढे झाले आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या