परभणी जिल्ह्यात आज कोरोनाचे 5 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या 154 वर पोहोचली आहे. परभणी शहरातील 2 व सेलू तालुक्यातील 3 व्यक्ती कोरोनबाधित आढळून आल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रकाश डाके यांनी दिली. कोरोनाबाधित रुग्णांपैकी चौघांचा मृत्यू झाला आहे. तसेच 102 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने रुग्णालयाने डिस्चार्ज देण्यात आला आहे. 48 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दर्गा रस्त्यावरील गंगापुत्र कॉलनी 1, गुलाम अली नगर 1 व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्या. तसेच सेलू तालुक्यातील एकूण 3 व्यक्ती बाधित आढळून आल्या आहेत. नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रयोगशाळेस येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातून सोमवारी एकूण 11 संशयितांचे स्वॅब पाठविण्यात आले होते. त्यापैकी काही स्वॅबचा अहवाल आज प्राप्त झाला. त्यातून 5 व्यक्ती बाधित आढळल्या. दरम्यान, परभणी शहरातील गुलामअली नगरातील 60 वर्षीय महिला तसेच गंगापूत्र कॉलनीतील 45 वर्षीय व्यक्ती तसेच सेलू शहरातील शास्त्री नगरातील 30 वर्षीय व्यक्ती, मोंढा परिसरातील 57 वर्षीय महिला तसेच तालुक्यातील रवळगाव येथील 29 वर्षीय पुरूष कोरोनाबाधित आढळले असून त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 154 एवढी झाली आहे.




























































