मालवण-कुडाळ साठी ५ कोटी निधी मंजूर

855

आमदार वैभव नाईक यांच्या मंत्रालयातील सततच्या पाठपुराव्यातून कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात शिवसेना युती शासनाच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात विकासनिधीं उपल्बध झाला आहे.

पालकमंत्री दीपक केसरकर,  खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार वैभव नाईक यांनी ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे विकासनिधीं उपलब्ध होण्याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर पुन्हा एकदा २५/१५ ग्रामविकास निधी अंतर्गत कुडाळ मालवण तालुक्यासाठी ५ कोटीचा निधी मंजूर झाला आहे.

मंजूर विकास निधीमधून कुडाळ मालवण तालुक्यातील तब्बल १२४  विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

गेल्या पाच वर्षात आतापर्यत २३ कोटींचा निधी कुडाळ मालवण तालुक्यासाठी मंजूर  करून आणण्यात आमदार नाईक यांना यश आले. अन्य योजनेतूनही अनेक कामे मार्गी लागली.  मंजूर झालेली कामेही  लवकरच पूर्णत्वास नेली जाणार आहेत. अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या