
मुंबईकर आणि विद्यार्थीही आता दुर्घटना, नैसर्गिक आपत्ती-संकटांचा सामना करणार आहेत. यासाठी पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून पाच दिवसीय ट्रेनिंग देण्यात येणार असून बचाव कार्याप्रसंगी वापरात येणारे लाइफ जॅकेट, हेल्मेट, प्रथमोपचार साहित्य असे साहित्यही दिले जाणार आहे. पालिकेच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ आज अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
13 ऑक्टोबर हा दिवस जागतिक आपत्ती जोखीम घट दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. आपत्तींमधील धोके कमी करण्यासाठी प्रशासन आणि नागरिक यांना प्रोत्साहित करण्यासाठी हा दिकस साजरा करण्यात येतो. संभाक्य आपत्कालीन स्थितीचा मुकाबला करण्याकरिता सक्षम अशा टीम सज्ज ठेवण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी आपत्कालीन क्यकस्थापन संचालक महेश नार्केकर, आपत्कालीन क्यकस्थापन कक्षाच्या प्रमुख अधिकारी रश्मी लोखंडे उपस्थित होत्या.
असा राबवणार उपक्रम
– पालिकेमार्फत मुंबईकरिता ‘आपदा मित्र’ या संकल्पनेअंतर्गत पहिल्या तुकडीचा प्रशिक्षण कार्यक्रम 17 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार असून 5 दिवसांच्या या प्रशिक्षण कालावधीमध्ये ‘आपदा मित्रां’ना आपत्ती परिस्थितीत काम करण्याचे, प्रथमोपचार, सीपीआर यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
– प्रशिक्षण यशस्कीपणे पूर्ण करणाऱया प्रशिक्षणार्थींना महाराष्ट्र शासनामार्फत देण्यात आलेल्या आपत्कालीन परिस्थितीत कापराकयाचा संच, प्रमाणपत्र तसेच ‘आपदा मित्र’ ओळखपत्र दिले जाणार आहे. प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थींची नाके ते राहात असलेल्या इमारतींमध्ये दर्शनी भागांकर प्रदर्शित करण्यात येतील.



























































