
सामना ऑनलाईन, हौशंगाबाद
मंदसौर बलात्काराच्या आरोपींचा शिरच्छेद करणार्यास व्यक्तीस ५ लाख रुपये बक्षीस म्हणून देण्याचे संजीव मिश्रा या मध्य प्रदेशच्या भाजप नेत्याने जाहीर केले आहे. फ़ेसबुकवर एक पोस्ट लिहून त्यांनी हे बक्षीस जाहीर केले असून सदर पोस्ट व्हायरल होत आहे. ‘असे आरोपी न्यायालयातून सुटून जातात, त्यांचा शिरच्छेद करणे हे योग्य आहे. जो कोणी या आरोपींचा शिरच्छेद करेल त्याला आपण ५ लाख रुपये देऊ’, असे त्यांनी जाहीर केले.
We demand capital punishment for the accused. If Court or administration is not capable of doing it, I have said I will give Rs. 5 Lakh to the person who beheads the accused and gets his head: Sanjeev Mishra, BJP on Mandsaur gang rape #MadhyaPradesh pic.twitter.com/VfZMijdtBH
— ANI (@ANI) July 1, 2018
तसेच या प्रकरणासंबंधात त्यांनी राष्ट्रपतींना पत्रही लिहिले आहे. बलात्काराचा खटला हा फ़ास्ट ट्रॅक कोर्टातून चालावा अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे. फ़ास्ट ट्रॅक कोर्टातून आरोपींना देहातांची शिक्षा मिळावी आणि जर त्यांनी राष्ट्रपतीकडे दयेचा अर्ज केला तर तो फेटाळण्यात यावा, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.
फाशीच्या मागणीसाठी जनता रस्त्यावर
आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी राज्यातील वेगवेळ्या संघटना रस्त्यावर उतरल्या. त्यात काँग्रेस, युवा मोर्चा आणि अखिल भारतीय मुस्लिम संघाचा समावेश होता. मंदसौर बलात्कार घटनेमुळे मध्य प्रदेश मधील जनमानस ढवळून निघाले आहे. समाजाच्या प्रत्येक स्तरातून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे.



























































