बुलढाण्यातून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 46 अहवाल मिळाले आहेत. त्यापैकी 41 अहवाल कोरोना निगेटिव्ह आले असून 5 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. मिळालेले पॉझिटिव्ह अहवाल संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील 33 वर्षीय पुरुष, 22 वर्षीय तरुण आणि 22 वर्षीय महिला आणि खामगाव तालुक्यातील चिखली येथील 25 वर्षीय तरुण रुग्णाचे आहेत.
मलकापूर येथील पारपेट भागातील 65 वर्षीय वृद्ध रुग्णाचा उपचारादरम्यान बुलडाण्यातील कोविड रुग्णालयात मृत्यू झाला. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 5 झाली आहे. त्या रुग्णाला 12 जून रोजी कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आतापर्यंत 1750 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात एकूण 118 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. तर आतापर्यंत पाच जणांचा मृ्त्यू झाला आहे. आतापर्यंत 77 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना जिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 77 झाली आहे. सध्या रूग्णालयात 36 कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने 119 आहेत, अशी माहिती निवासी उप जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.





























































