
सांगली जिह्यात आज कोरोनाचे 5 नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 17 झाली आहे.
सांगली जिह्यात कोरोनाचे संकट पुन्हा एकदा सुरू झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. सांगली महापालिका क्षेत्रात 4 आणि शिराळा तालुक्यात 1 नवा रुग्ण आज आढळून आला. जिह्यात सध्या 17 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी एक रुग्ण गंभीर आहे. आज अखेर जिह्यात 2,15,459 जणांना कोरोनाची बाधा झाली. तर 2,09,930 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनामुळे आजअखेर 5,517 जणांचा मृत्यू झाला आहे.



























































