कश्मीरात पाच दहशतवाद्यांचा खात्मा, जवानांवर दगडफेक, पेट्रोल बॉम्ब फेकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू-कश्मीरात शोपियानमध्ये शुक्रवारी रात्रीपासून सुरू असलेल्या चकमकीत लष्कराच्या जवानांनी पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या ‘सर्च ऑपरेशन’वेळी फुटीरवादी, माथेफिरू तरुणांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. जवानांवर दगडफेक करीत पेट्रोल बॉम्ब फेकले. खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये ‘लष्कर-ए-तोयबा’चा स्थानिक कमांडर उमर नाजीर मलिक, वकर अहमद शेख, अझिझ अहमद, अर्शद खान आणि अरिफ मिर यांचा समावेश आहे.

हिंसाचारात १ ठार, १० जखमी
कश्मीर खोऱयात चकमकीवेळी सुरक्षा दलाच्या जवानांवर दगडफेक करण्याच्या घटना सातत्याने सुरूच आहेत. आज जवानांवर पेट्रोलबॉम्ब फेकले. यावेळी भडकलेल्या हिंसाचारात बिलाल अहमद खान हा गोळीबारात ठार झाला. दहाजण जखमी झाले आहेत.