जम्मू-कश्मीरमध्ये पाच दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-कश्मीरच्या कुपवाडा जिह्यात सुरक्षा दलाने गुरुवारी माछिल सेक्टरमध्ये नियंत्रण रेषा (एलओसी) वर घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. गेल्या पाच दिवसांत कश्मीरमध्ये घुसखोरी करण्याची ही दुसरी घटना असून ती अयशस्वी करण्यात आली. याआधी 22 ऑक्टोबरला बारामुल्लाच्या उरी सेक्टरमध्ये दोन घुसखोरांना ठार करण्यात आले होते.

या दहशतवाद्यांची ओळख पटवली जात आहे. याआधी श्रीनगर येथील लष्कराच्या चिनार कोरने सोशल मीडिया एक्सवर लिहिलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले की, कुपवाडा सेक्टरमध्ये सीमारेषेवर 26 ऑक्टोबरला सुरू करण्यात आलेल्या हिंदुस्थानी जवान, जम्मू-कश्मीर पोलीस आणि गुप्तचर संस्थेने चालवलेल्या एका संयुक्त सर्च मोहिमेत कुपवाडात घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांचा प्रयत्न हाणून पाडला आहे. दरम्यान, रविवारी जम्मू-कश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषा (एलओसी) वर सुरक्षा दलाने घुसखोरी रोखत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.