उघड्यावर शौचाला गेलेल्या पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार

प्रातिनिथिक फोटो

स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रत्येक गल्लीत शौचालय बांधण्याचा उपक्रम केंद्र सरकारने सुरू केला असला तरी अद्याप अनेक गावांमध्ये शौचालयाची सोय नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. अशाच एका राजस्थानातील गावात एका पाच वर्षाच्या मुलीवर शेतात शौचाला गेलेली असताना एका नराधमाने बलात्कार केल्याचे समोर आले आहे. या नराधमाने मुलीला बंद असलेल्या शाळेत नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

राजस्थानमधील बारण जिल्ह्यातील शानबाद गावात ही घटना घडली आहे. या गावात राहणारी पीडित मुलगी घराशेजारील शेतात शौचाला गेली होती. तिथे दारुच्या नशेत तर्राट असलेला महावीर नावाचा तरुण आला व त्याने मुलीचे अपहरण करून तिला शाळेत नेले. तिथे तिच्यावर बलात्कार करून तो पळून गेला. त्यानंतर सदर मुलगी जखमी अवस्थेत शाळेबाहेर आली. शाळेबाहेर बेशुद्धावस्थेत पडलेल्या मुलीला पाहून तिच्या पालकांनी व गावकऱ्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपासानंतर महावीरला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबूली केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या