
मुंबई, पुणे, ठाणे अशा महानगरात नोकरी करणाऱया महिलांची वाढती संख्या आणि त्यांच्या सुरक्षित जागेचा प्रश्न लक्षात घेऊन मुंबई शहरात चार, मुंबईच्या उपनगरात सहा, ठाणे व पुण्यात चार आणि राज्यातील उर्वरित 31 जिह्यांमध्ये प्रत्येकी एक अशी 50 वसतिगृहांची योजना राबवण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रत्येक वसतिगृहात 100 महिलांची राहण्याची व्यवस्था होईल. नोकरी करणाऱया महिलांचे वसतिगृह या सुधारित योजनेअंतर्गत ही वसतिगृहे सुरू होणार आहेत.
मुंबई, पुणे, ठाणे अशा महानगरात नोकरीसाठी येणाऱया महिलांचा राहण्यासाठी सुरक्षित जागा मिळवण्याचा प्रश्न बऱयाच अंशी मार्गी लागणार आहे. एकल महिला, विधवा, घटस्पहटित आदी महिलांसह कुटुंबातील जवळचे कोणतेही सदस्य त्या शहरात नाहीत अशा विवाहित महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. याशिवाय नोकरीसाठी प्रशिक्षण घेणाऱया महिलांनाही या ठिकाणी 30 टक्क्यांपर्यंत जागा आरक्षित राहणार आहेत. त्यामुळे अशा महिलांना नोकरीच्या चांगल्या संधी मिळवण्यास प्रोत्साहन मिळेल.
पूर्वी ही योजना सरकारचे 75 टक्के व स्वयंसेवी संस्थांचा 25 टक्के हिस्सा या तत्त्वावर चालत होती; पण आता सुधारित योजनेनुसार पेंद्राचा हिस्सा 60 टक्के, राज्य सरकारचा 15 टक्के व स्वंयसेवी संस्थांचा 25 टक्के या तत्त्वावर राबवण्यास मान्यता दिली.
या 50 वसतिगृहांच्या फर्निचरसाठी राज्य सरकारचा हिस्सा म्हणून 1 कोटी 50 लाख रुपये एकरकमी देण्यास मान्यता देण्यात आली. वसतिगृहाच्या भाडय़ापोटी राज्य सरकारचा 15 टक्के हिस्सा याप्रमाणे दरवर्षी 75 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे. भाडे व फर्निचरचा खर्च मिळून 2 कोटी 25 लाख रुपयांच्या खर्चास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
‘नोकरी करणाऱया महिलांचे वसतिगृह’ या योजनेला आजच्या मंत्रिमंडळ निर्णयामुळे गती मिळणार असून मुंबई, पुणे, ठाणे या महानगरांप्रमाणेच जिह्यांच्या ठिकाणी नोकरी करणाऱया महिलांना मोठा दिलासा मिळेल, असे महिला व बालविकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर म्हणाल्या.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव राज्यात लोकसहभागातून साजरा करणार राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन
देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष राज्यभर 15 ऑगस्ट 2023 पर्यंत विविध कार्यक्रमांनी साजरे करण्यात येणार असून पेंद्राच्या सूचनेप्रमाणे महाराष्ट्राचे राज्यगीत तयार करण्यात येणार आहे.
पेंद्र शासनाने प्रत्येक राज्याचे ‘राज्यगीत’ तयार करण्यात यावे अशी सूचना केली आहे. त्याअनुषंगाने राज्यगीताची निर्मिती करण्यावरदेखील चर्चा करण्यात आली. या सोहळ्यानिमित्त राज्यभर शिक्षण, सांस्कृतिक, पर्यटन, नगर विकास, सार्वजनिक बांधकाम, सहकार, कृषी व महिला व बालकल्याण इत्यादी विभागांतर्गत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. त्यामध्ये विद्यार्थी, नागरिक, विविध संस्था यांचा सहभाग मोठय़ा प्रमाणावर असेल. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढय़ाला पुढील वर्षी 75 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने 15 ऑगस्ट 2023 पर्यंत राज्यभर विविध कार्यक्रम राबवून अमृत महोत्सवी वर्षाचा सोहळा साजरा करणे अपेक्षित आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचे सादरीकरण झाले.
हेरिटेज वॉक ते सायकल वॉक
‘इंडियॉ 75’ याअंतर्गत विविध कार्यक्रम राबवावयाचे असून, स्वातंत्र्यलढा, संकल्प, संकल्पना यावर आधारित कार्यक्रमाची आखणी करण्यात येईल. कार्यक्रमांची संकल्पना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव याभोवती गुंफलेली असेल. हिंदुस्थानचा स्वातंत्र्यसंग्राम, नावीन्यपूर्ण कल्पना, नवे संकल्प, स्वातंत्र्योत्तर फलनिष्पत्ती आणि अंमलबजावणी या संकल्पनेवर कार्यक्रम आधारलेले असतील. स्वातंत्र्य चळवळीतील अज्ञात नायकांना आदरांजली वाहण्यासाठी हेरिटेज वॉक, सायकल वॉक अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.





























































