
उत्तर हिंदुस्थानात थंडी मी म्हणतेय. हवेची दिशा बदलल्यामुळे गेल्या 22 वर्षातील सर्वाधिक थंडी उत्तर हिंदुस्थानात पडली आहे. रविवारी दिल्लीत थोडी थंडी कमी झाली आहे, परंतु हरयाणा, पंजाब आणि राजस्थानमध्ये अजूनही पारा खालीच आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये थंडीने कहरच केला आहे. थंडीमुळे उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत 50 जणांचा मृत्यू झाला आहे.
दिल्लीत 2.5 डीग्री सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. वायव्येकडून हवेची दिशा बदलल्यामुळे दिल्लीचे तापमान घटल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशमध्ये किमान तापमान 6.9 सेल्सियस डिग्री नोंदवले गेले आहे. राज्याच्या कानपूर, देहात, उन्नाव, चित्रकूट, हमीरपूर, महोबा, फतेहपूर आणि सुलतानपूरमध्ये दोन डीग्री नोंदले गेले आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत 50 जणांचा मृत्यू झाला आहे. लखनौमध्ये थोडे ऊन पडल्याने नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. राज्याच्या बहराईच आणि श्रावस्ती जिल्ह्यात सुर्यदर्शनही झालेले नाही.























































