बोरिवलीत 50 वर्षांपूर्वीची विहीर खचली,सोसायटीला पालिकेची नोटीस

28

सामना ऑनलाईन, मुंबई

बोरिवली पश्चिम येथील दत्तानी पार्क सोसायटीच्या आकारात असलेल्या 50 वर्षांपूर्कीच्या विहिरीचा भाग खचल्याची घटना आज सायंकाळी 6.30 च्या सुमारास घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तर संबंधित सोसायटीला बेजाबदारपणाबद्दल पालिकेने नोटीस दिली आहे.  दरम्यान  सुरक्षिततेच्या दृष्टीने पालिकेने विहिरीच्या सभोवताली कुंपण घालून रस्ता बंद केला आहे.

राजेंद्र नगर फ्लायओक्हर कोरा केंद्राजवळ असलेल्या दत्तानी पार्क सोसायटीच्या जवळ एक 50 वर्षांपूर्वीची जुनी विहीर आहे. संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास या विहिरीचा वरच्या बाजूचा संपूर्ण (कठडा) व खालचा काही भाग अचानक खचला. याची माहिती मिळताच अग्निशमन दल व पोलिसांनी  घटनास्थळी धाव घेतली. विहिरीजवळ सोसायटीचे उद्यान आहे. उद्यानाजवळ एक भिंत आहे. त्या भिंतीचा भाग  विहिरीवर कोसळून विहिरीचा भाग खचला. यावेळी बाजूला असलेले झाड व  इलेक्ट्रिक सबस्टेशन खचलेल्या विहिरीत गेले.

आपली प्रतिक्रिया द्या