
1 ते 4 नोव्हेंबरदरम्यान ग्वाल्हेर येथे होणाऱ्या 50 व्या ज्युनियर राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत बाजी मारण्याच्या ध्येयाने महाराष्ट्राचा कॅरम संघ रवाना झाला आहे. या स्पर्धेसाठी मुंबई, ठाणे, मुंबई उपनगर, पालघर, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग शिवाय प्रथमच कोल्हापूरच्या तीन खेळाडूंची संघात निवड करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र कॅरम संघटनेने दिली. राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत जोरदार कामगिरी करता यावी म्हणून 28 व 29 ऑक्टोबरला या संघाचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात ज्येष्ठ कॅरमपटू संजय मांडे व आंतरराष्ट्रीय पंच केतन चिखले यांनी संघाला मार्गदर्शन केले.
महाराष्ट्राचा ज्युनियर संघ पुढीलप्रमाणे
18 वर्षाखालील मुले ः 1) आयुष गरुड (पुणे ), 2) ओम पारकर (रत्नागिरी ), 3) मुनावर सय्यद (मुंबई उपनगर), 4) उमर शेख (मुंबई), 5) ओमकार वडर (कोल्हापूर), 6) महम्मद शेख (कोल्हापूर ) 21 वर्षांखालील मुले (युथ) ः 1. मिहीर शेख (मुंबई), 2. ओजस जाधव (मुंबई), संघ व्यवस्थापक ः वासिम खान (पुणे ) 18 वर्षांखालील मुली ः 1. सोनाली पुमारी (मुंबई), 2. मधुरा देवळे (ठाणे), 3. सिमरन शिंदे (मुंबई), 4. ईश्वरी पाटील (कोल्हापूर), 5. तनया पाटील (पुणे), 6.जिया पटेल (पालघर), 21 वर्षांखालील मुली (युथ) ः 1. आकांक्षा कदम (रत्नागिरी), 2. दीक्षा चव्हाण (सिंधुदुर्ग), संघ व्यवस्थापक ः मयूरी भामरे (धुळे).
 
             
		




































 
     
    




















