चंद्रपूरमध्ये गोवंश तस्करीविरोधात वर्षभरात 51 कारवाया;120 आरोपींना अटक, 1 हजार गोवंशाची सूटका

गोवंशाची कत्तल रोखण्यासाठी सरकारने कायदा अंमलात आणला. मात्र, कायद्याला न जूमानता चंद्रपूर जिल्ह्यातून लगतच्या जिल्ह्यात तसेच परराज्यातील तेलंगणात कत्तलीसाठी जनावरांची तस्करी सूरूच आहे. हा चिंतेचा विषय असला तरी स्थानिक गुन्हा शाखा आणि पोलीस विभागाने केलेल्या कार्यवाहीचा आकडा दिलासा देणारा आहे.

जिल्ह्यातील गोवंश तस्करीला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षकांनी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे आणि जिल्ह्यातील सर्व पोलीस निरीक्षकांना दक्ष राहण्याचा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यामधून वर्षभरात 51 कारवाया करण्यात आल्या. तस्करी करणाऱ्या 120 जणांना अटक करण्यात आली तर 1000 चा वर गोवंशाची सूटका करण्यात आली. या कार्यवाहीमुळे काही प्रमाणात जिल्ह्यातील गोवंश तस्करीला आळा बसला आहे.