देशात आढळले कोरोनाचे 53 हजार रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 18 लाखांच्या घरात

677

गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 53 हजार रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 18 लाखांच्या घरात गेली आहे. गेल्या 24 तासात जगात हिंदुस्थानात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. हिंदुस्थाननंतर अमेरिकेत 47 हजार 511 तर ब्राझीलमध्ये 25 हजार 800 रुग्ण सापडले आहेत.

कोरोना सेंटरमध्ये डॉक्टरकडून महिला रुग्णाचे लैंगिक शोषण 

गेल्या 24 तासात देशात 53 हजार रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या 18 लाख 3 हजार 695 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासात देशात 771 रुग्णांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे मृतांचा आकडा 38 हजार 135 वर पोहोचला आहे.

राज्यात दिवसभरात 9 हजार 926 कोरोनामुक्त, 9 हजार 509 रुग्ण पॉझिटिव्ह 

जगभरात आतापर्यंत एक कोटी 80 लाख कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. तर 6 लाख 90 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या