दिल्लीमध्ये दोन हजार कोटी रुपयांचे 560 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. देशाच्या राजधानीत आतापर्यंत ही सर्वात मोठी कारवाई आहे. यात प्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे.
Delhi Police busted an international drug syndicate and seized more than 560 kgs of cocaine. 4 people arrested. The cocaine is worth more than Rs 2000 Crores in the international market. Narco-terror angle being investigated: Delhi Police Special Cell
— ANI (@ANI) October 2, 2024
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या मागे आंतरराष्ट्रीय टोळी आहे. रविवारी पोलिसांनी 400 ग्रॅम हिरॉईन आणि 160 ग्रॅम कोकेन सापडल्या प्रकरणी अफगाणिस्तानच्या दोन नागरिकांना अटक केली होती. त्याच दिवशी इंदिरा गांधी विमानतळावर 24 कोटी रुपयांची दीड हजार ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले होते.