हिंदुस्थानी पथकातून पदक विजेते खेळाडू बाहेर

43

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने रविवारी इंडोनेशियातील जकार्ता व पालेमबांग येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी हिंदुस्थानी पथकाची घोषणा केली. यामध्ये 572 खेळाडूंचा समावेश करण्यात आला. यामध्ये 312 पुरुष तसेच 260 महिला खेळाडूंचा सहभाग असणार आहे. मात्र आगामी प्रतिष्ठेच्या स्पर्धांत काही पदकविजेत्या खेळाडूंना स्थान मिळालेले नाही. यामध्ये मेरी कोम, तेजस्विनी सावंत, राहुल आवारे, मीराबाई चानू यांच्यासह राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांत पदक मिळवलेले आणखी खेळाडू आहेत.
मेरी कोम हिला आपल्या आवडत्या 48 किलो वजनी गटात खेळण्याची संधी न मिळाल्यामुळे तिने माघार घेतली. मीराबाई चानू हिने दुखापतीमुळे माघार घेतली. तसेच संजीता चानू ही डोपिंगमध्ये दोषी सापडल्यामुळे बाहेर आहे. बेशिस्त वर्तणुकीमुळे पूनम यादवला स्थान मिळाले नाही. तसेच वेंकट राहुललाही पात्र होता आले नाही. बबिताने सराव शिबिराला दांडी मारली तर सोमवीर व राहुल आवारे यांनी आपल्या वजनात घट केली नाही त्यामुळे त्यांना बाहेर बसावे लागले.

हे ते खेळाडू
मेरीकोम (बॉक्सिंग), जीतू राय (नेमबाजी), सचिन चौधरी (पॉवरलिफ्टिंग), संजीव राजपूत (नेमबाजी), तेजस्विनी सावंत (नेमबाजी), वेंकट राहुल (वेटलिफ्टिंग), मीराबाई चानू (वेटलिफ्टिंग), संजीता चानू (वेटलिफ्टिंग), पूनम यादव (वेटलिफ्टिंग), प्रदीप सिंग (वेटलिफ्टिंग), गुरुराजा (वेटलिफ्टिंग), बबिता (कुस्ती), नवजीत ढिल्लन (ऍथलेटिक्स), नमन तंवर (बॉक्सिंग), मनीष कौशिक (बॉक्सिंग), ओम् मितरवाल (नेमबाजी), राहुल आवारे (कुस्ती), मेहुली घोष (नेमबाजी), दीपक लाथेर (वेटलिफ्टिंग), सोमवीर (कुस्ती).

आपली प्रतिक्रिया द्या