
लसीचा प्रिकॉशन डोस घेण्यासाठी 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना डॉक्टरचे सर्टिफिकेट किंवा इतर कोणत्याही प्रमाणपत्राची गरज नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालाने जाहीर केले आहे.
देशात शनिवारपासून 15 ते 18 वर्षांच्या मुलांचे लसीकरण सुरू होणार आहे. तसेच 10 जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी, इतर फ्रंटलाईन वर्कर्स आणि 60 वर्षांवरील नागरिकांना तिसरा अर्थात प्रिकॉशन डोस देण्यात येणार आहे. यासंदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने मंगळवारी गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.
काय आहेत गाइडलाइन्स
n 60 वर्षांवरील आणि गंभीर आजार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लसीचा प्रिकॉशन डोस घेण्यासाठी डॉक्टरांचे सर्टिफिकेट किंवा इतर प्रमाणपत्रे देण्याची आवश्यकता नाही.
n प्रिकॉशन डोस घेण्यापूर्वी गंभीर आजार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी मात्र आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. प्रकृतीच्या दृष्टीने आरोग्य मंत्रालयाने ही सूचना केली आहे.
n 15 ते 18 वर्षांच्या मुलांना डोससाठी ऑनलाइन अपॉइनमेंट घेता येईल किंवा केंद्रावर जाऊन लस मिळेल. पण लसीकरण केंद्रांवर स्लॉट उपलब्ध असल्यावरच डोस मिळेल.
n लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर प्रिकॉशन डोस घेण्यासाठी 39 आठवडे म्हणजे 9 महिन्यांचा कालावधी झालेला पाहिजे.
n निवडणूक होणाऱया राज्यात तैनात असलेल्या जवानांचाही फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून समावेश करण्यात आला आहे.


























































