दिल्लीत 600 किलोंचे फटाके जप्त, 7 जणांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक छायाचित्र

दिल्लीत पोलिसांनी 600 किलोंचे फटाके जप्त केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर दिल्ली सरकारने फटाके खरेदी विक्रीवर बंदी घातली आहे. असे असले तरी पोलिसांनी बेकायदेशीरपणे फटाके विक्री प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीकडून 600 किलो फटाके जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय राज्यात फटाके विक्री प्रकरणी 8 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आणखी एका व्यक्तीला अटक केली असून 1 किलो फटाके जप्त करण्यात आले आहेत.