
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबईसह राज्यभरात 23 जूनपासून प्लॅस्टिकबंदी लागू केल्यानंतरही अनेक ठिकाणी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सुरूच असल्याचे समोर येत आहे. पालिकेच्या परवाना विभागाने मरोळ येथे केलेल्या कारवाईत तब्बल 620 किलो बंदी घातलेले प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहे.
पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या प्लॅस्टिकवर राज्य सरकारने 23 जून 2018 पासून बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या माध्यमातून मुंबईभरात जोरदार कारवाई सुरू आहे. यामध्ये दिवसाला एक लाखापासून दोन लाखांपर्यंत दंडही वसूल करण्यात येत आहे. प्लॅस्टिकबंदीच्या अंमलबजाकणीसाठी पालिकेने 310 निरीक्षकांची पथके तयार केली असून यामध्ये दुकाने क आस्थापना आणि परकाना किभागातील निरीक्षकांचा या पथकात समाकेश आहे. निळय़ा गणकेशधारी निरीक्षकांचे पथक ‘ब्लू स्कॉड’ म्हणून ओळखले जात असून दुकाने, मॉल, फेरीवाले, उत्पादक आणि विक्रेत्यांवर ही कारवाई सुरू आहे.
जप्त केलेल्या प्लॅस्टिकचा प्रश्न गंभीर
पालिकेने केलेल्या कारवाईत आतापर्यंत 60 हजार किलोंवर प्लॅस्टिक जप्त केले आहे. हे प्लॅस्टिक पालिकेच्या गोडाऊनमध्ये पडून आहे, मात्र या प्लॅस्टिकच्या विल्हेवाटीसाठी पालिकेला अद्याप कंत्राटदार मिळत नसल्याने या प्लॅस्टिकचे करायचे काय असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. यातच लोकसभा आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर काही प्रमाणात थंडावलेली कारवाई आता पुन्हा तीक्र करण्यात आली असून जप्त करणारे प्लॅस्टिक सांभाळण्याचे आव्हान पालिकेला आहे.






















































