लातूरकरांसाठी दिलासादायक बातमी 63 अहवाल निगेटिव्ह आले

1089

25 मे रोजी लातूर जिल्ह्यातील 82 जणांचे स्वॅब तपासणीसाठी येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आलेले होते. 63 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले, त्याचप्रमाणे काल उपचारानंतर कोरोनाग्रस्त असणाऱ्या 10 जणांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे लातूरकरांना थोडासा दिलासा मिळालेला आहे. परंतु तब्बल 19 अहवाल प्रलंबित ठेवण्यात आल्यामुळे सर्वांच्या चिंतेत पुन्हा भरच पडलेली आहे.

येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत 21 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आलेले होते. त्यातील 13 जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेले होते तर 8 जणांचे अहवाल प्रलंबीत होते. उपजिल्हा रुग्णालय उदगीर येथून ४२ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आलेले होते. त्यापैकी ३७ व्यक्तींचे स्वॅब निगेटिव्ह आलेले होते. परंतु 5 व्यक्तींचे स्वॅब प्रलंबित होते. उदगीर तालुक्यातील लोणी येथील कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या घरातील 19 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आलेले होते. परंतू 5 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित असल्याने उदगीर तालुक्यातील नागरिकांची धाकधूक वाढलेली आहे.

निलंगा येथून १६ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आलेले होते. त्यामधील १० व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत परंतू ६ अहवाल प्रलंबीत राहिलेले असल्याने निलंगा तालूक्यातील नागरिकांची चिंता वाढलेली आहे. रेणापूर तालूक्यातील ३ व्यक्तींचे स्वॅब आलेले होते मात्र सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने रेणापूर तालूक्यातील नागरिकांना दिलासा मिळालेला आहे.

कोरोनाग्रस्त असणाऱ्या 10 जणांवर उदगीर येथील रुग्णालयात उपचार केले जात होते. उपचारानंतर त्यांना काल घरी सोडण्यात आले. लातूर जिल्हा वासियांससाठी ही चांगलीच दिलासा देणारी बातमी आहे. परंतु तब्बल 19 अहवाल प्रलंबित राहिल्याने सर्वांची चिंता वाढलेली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या