
63 मून्स कंपनीमधील कोटय़वधी रुपयांच्या गैरव्यवहाराप्रकरणी करण्यात आलेल्या आरोपांबाबत माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यासह दोघांविरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीबाबत प्राथमिक चौकशी सुरू असल्याची माहिती सीबीआयच्या वतीने सोमवारी हायकोर्टात देण्यात आली. याचिकाकर्त्याकडून कोणतेही पुरावे किंवा कागदपत्रे सीबीआयला देण्यात आली नसल्याचेही यावेळी खंडपीठाला सांगण्यात आले.
63 मून्स कंपनीला एनएसईएल गैरव्यवहारप्रकरणी सुमारे दहा हजार कोटी रुपयांच्या आर्थिक नुकसान झाल्याचा दावा कंपनीने केला आहे. यामध्ये चिदंबरम यांच्यासह सनदी अधिकारी के. पी. पृष्णन आणि रमेश अभिषेक यांचा समावेश आहे. तत्कालीन कालावधीमध्ये चिदंबरम केंद्रीय अर्थमंत्री होते तर पृष्णन काwशल्य व्यवस्थापन विभागाचे सचिव तर रमेश फॉर्वड मार्पेटस कमिशनचे अध्यक्ष होते.

























































