
64 मेगापिक्सल कॅमेरा आणि 8 GB रॅम असलेला Vivo V23e स्मार्टफोन लवकरच लॉन्च होणार आहे. या फोनमध्ये 128 GB पर्यंत इंटर्नल मेमरी देण्यात आली आहे.
Vivo V23e Specification
Vivo V23e मध्ये 4050 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून 44 वॅट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये लेटेस्ट अँड्रॉईड सिस्टम 11 देण्यात आली आहे. तसेच फोनमध्ये मीडियाटेक हिलियो G96 प्रोसेसरचाही समावेश आहे. फोनमध्ये 8 GBचा रॅम देण्यात आला असून 128 GB इंटर्नल मेमरी देण्यात आली आहे.
64 मेगापिक्सल कॅमेरा
Vivo V23e मध्ये 64 मेगापिक्सलच कॅमेरा देण्यात आला आहे. तर 8 मेगापिक्स्लाचा अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेराही देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाथी 50 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. Vivo V23e हा फोन 23 नोव्हेंबर रोजी एका ऑनलाईन इव्हेंटमध्ये लॉन्च होणार आहे.

































































