
Realme GT Neo 2 या स्मार्टफोनचा टीजर लॉन्च झाला आहे. या फोनमध्ये 64 मेगापिक्सलचा कॅमेरा असून 8 GB चा RAM देण्यात आला आहे. लवकरच हा फोन हिंदुस्थानमध्ये लॉन्च होणार आहे.
या फोनमध्ये एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये लेटेस्ट अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर क्वाल कॉम स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये 8 GBचा RAM 128 इंटर्नल मेमरी देण्यात आली आहे.
Realme GT Neo 2 मध्ये 64 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मायक्रो लेन्स देण्यात आली आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून 65 वॅट चार्जिंग सपोर्टही देण्यात आला आहे. हा फोन लवकरच हिंदुस्थानमध्ये लॉन्च होणार असून त्याची किंमत 30 हजार पर्यंत असेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.






























































