नगर जिल्ह्यात नवे 64 रुग्ण; 465 जण कोरोनामुक्त झाल्याने मिळाला डिस्चार्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिल्ह्यात रविवारी तब्बल 465 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या आता 1945 झाली आहे. शनिवार सायंकाळपासून रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत नवे 64 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता 1136 इतकी झाली असून एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3132 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये 64 जण कोरोनाबाधित आढळून आले. यामध्ये नगर (2), नगर (1), फकिरवाड़ा(1), संगमनेर (36), पदमा नगर (4), बाजारपेठ (2), जनता नगर (2), जेढे कॉलनी (3), संगमनेर (3), विद्यानगर (2), बडोदा बँक (3), राजापूर(2), कोंची (1), पिंपळगाव देपा(1), सुकेवाडी(3), शिबलापूर(1), गणेशनगर (3), कुरण (1), मुटकुळे हॉस्पिटल(1), खंडोबा गल्ली(2), गुंजाळवाडी (1), जवळे कडलग (1), कर्जत(10), राशीन(4), मिरजगाव(3), कर्जत (2), पिंपळवाडी (1), राहाता (12) – शिर्डी (10), नांदुरखी (1), गोगलगाव(1), राहुरी (4)- राहुरी बु. -(1), येवले आखाडा (1), वांबोरी(1), कात्रड(1) येथील रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात सध्या 1136 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1945 रुग्ण कोरोनावर मात करत बरे झाले आहेत. आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू झाला असून कोरोनाबाधितांची संख्या 3132 झाली आहे.