पुण्यात पाच वर्षांच्या बालिकेवर 67 वर्षांच्या नराधमाने केला लैंगिक अत्याचार

931
प्रातिनिधिक फोटो

हैदराबाद, उन्नाव येथील महाभयंकर अशा घटनांमुळे सध्या देशभरात संतापाची लाट पसरली आहे. देशभरातून बलात्कारविरोधातील कायदे कडक करण्याची मागणी होत असली तरी देशभरात बलात्काराच्या घटना सुरूच आहेत. पुण्यातील पिंपरी येथे एका पाच वर्षाच्या चिमुरडीचा 67 वर्षाच्या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या धक्कादायक घटनेने पुणे हादरले असून सर्वत्र या घटनेचा निषेध केला जात आहे. दरम्यान पोलिसांनी त्या नराधम वृद्धाला अटक केली असून त्यांच्याविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

देशभरात सध्या बलात्काराच्या घटनांमधून संतप्त वातावरण आहे. बलात्काराचे खटले फास्टट्रॅक कोर्टात चालवले जावे व दोषींना सरसकट मृत्युदंडाची शिक्षा देण्यात येण्याची मागणी होत आहे. दरम्यान अल्पवयीन मुलींवर बलात्कार, अत्याचार करणाऱ्या नराधमांना दया याचिका करण्याचा अधिकारच नसल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या